जेएनपीटी (वार्ताहर) - जेएनपीटी आणि देशातील कोणत्याही बंदराचे खासगीकरण केले जाणार नाही आणि कामगारांच्या हिताला बाधा येईल असे कोणतेही धोरण केंद्र सरकार राबविणार नसल्याचा निर्वाळा केंद्रीय नौकानयन, रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी जेएनपीटीत बोलताना केला. केंद्रीय नौकानयन मंत्री मनसुख मांडविय यांच्या हस्ते जेएनपीटीचे दास्तान फाट्याजवळील शिवसमर्थ स्मारकातील संग्राहलयाचे शनिवारी ना.मनसुख मांडविय यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होतेजेएनपीटीच्या दौऱ्यात त्यांनी जेएनपीटीतील पाकींग प्लाझाकंटेनर स्कॅनिंग आणि वाय जंक्शन येथिल उड्डाण पुलाचे उदघाटन केले. त्यानंतर शिवसमर्थ स्मारकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानी बंदरे देशाची संपत्ती असून जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करणार नसल्याचे सांगितले. मांडविय यांनी संग्राहलायाचे उदघाटन केल्यानंतर संग्राहलायातील चित्रांचे आणि चित्रकारांचे कौतूक केले. मध्ययुगिन काळातील अजिंठा वेरूळ लेण्यांप्रमाणे ही चित्रे असून या चित्रांतून शिवाजी महाराजांचा इतिहास जीवंत केला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी, जयवंत ढवळे, आ. महेश बालदी, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, भूषण पाटील, जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत, सोनारी ग्रामपंचायत सरपंच पूनम कडू, तसेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि जेएनपीटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जेएनपीटीचे खाजगीकरण होणार नाही- केद्रीय मत्री मनसुख माडविय