निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरण चारही आरोपींना २० मार्च रोजी फासावर लटकावणार!

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातल्या दोषींना फासावर चढवण्याची तारीख आता निश्चित झालीय. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं चारही दोषींच्या फाशीसाठी २० मार्च ही तारीख निर्धारीत केलीय. पवन गुप्ता, अक्षय ठाकरू, विनय शर्मा आणि मुकेश या चारही जणांना २० मार्च रोजी सकाळी ५.३० वा. फासावर लटकावण्यात येणार आहे. त्यापूर्वी कोर्टाच्या नियमानुसार सर्व दोषी आपापल्या वकिलांची भेट घेऊ शकतीलउल्लेखनीय म्हणजे, निर्भयाच्या दोषींवर काढण्यात आलेलं हे चौथं डेथ वॉरंट आहे. या डेथ वॉरंटवर प्रतिक्रिया देताना दोषींचे वकील ए पी सिंह यांनी, 'दोषींची चार वेळा न्यायिक हत्या झालेली आहे. अजून किती वेळा दोषींची हत्या होणार?' असा प्रश्न विचारत भावनिक साद घातली. 'हा काही दहशतवादाचं प्रकरण नाही आणि दोषी तुरुंगात राहून सुधारणा करत होते' असंही सिंह यांनी यावेळी म्हटलं. उल्लेखनीय म्हणजे, अद्यापही कायदेशीर पर्याय बाकी असल्याचा दावा दोषींचे वकील एपी सिंह यांनी केलाय.