उरणकरांची रेल्वेची प्रतिक्षा लवकरच संपणार


उरण (प्रतिनिधी) - बेलापूर ते उरणदरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या कामाला पुन्हा एकदा गती आली आहे. आधीचे हे काम नवी मुंबईतील खारकोपरपर्यंत येऊन पोहोचले आहे. गेली २३ वर्षे या रेल्वेची उरणकरांना प्रतीक्षा आहे. मात्र आता कामाला वेगाने सुरुवात झाल्यामुळे लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मागील पाच वर्षांपासून या भागातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे सुरू असल्याने प्रचंड अशा दररोजच्या वाहतूक कोंडीलाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी तसेच व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत. ही कोडी लवकरात लवकर दूर करण्यासाठी रेल्वे सेवा सुरू दूर करण्यासाठा रल्व सवा सुरु झाल्यास दिलासा मिळेल, असे मत उरणमधील नागरिक महेश घरत यांनी व्यक्त केले आहे. उरणमधील रेल्वेची कामे सुरू असली तरी नवघर, बोकडविरा आदी गावांच्या परिसरातील स्थानकांना स्थानिक गावांची नावे । देण्याची मागणी केली जात आहे.


BOX


नवी मुंबईचाच एक भाग म्हणून सिडकोकडून उरण परिसराचाही विकास केला जात आहे. त्यात येथील बेलापूर ते उरण या रेल्वे मार्गाचाही समावेश आहे. उरणमधील जेएनपीटी बंदर, तसेच बंदरावर आधारित अनेक उद्योगांमुळे नागरीकरणातही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे एसटी, तसेच नवी मुंबईची वाहतूक व्यवस्था असलेल्या एनएमएमटीवर नागरिकांचा प्रवास अवलंबून आहे.