मुंबई (प्रतिनिधी) - बहु प्रतिक्षित व संपूर्ण महाराष्ट्रासाठी आकर्षण ठरलेल्या भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो से वेला रविवारी दुपारपासून सुरुवात झाली. दैनंदिन प्रवासी, रोजगाराच्या प्रतीक्षेत प्रवास करणारे तरुण तसेच कामानिमित्त मांडवा अणि अलिबागच्या इतर भागांमध्ये जाणा-या प्रवाशांना यानिमित्ताने दिलासा मिळणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचा हा प्रकल्प आहे. भाऊचा धक्का ते मांडवा रो - पॅक्स सेवेमुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होणार असून पर्यटनालाही चालना मिळणार आहे. भाऊचा धक्का येथील जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत करण्यात आलेले असून मांडवा येथील जेट्टीवर टर्मिनलचे बांधकाम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत करण्यात आले आहे केंद्र शासनाची सागरमाला योजना आणि राज्य शासनाकडून ५०-५० टक्के या प्रमाणात निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यानच्या रो-पॅक्स सेवेसाठी एमटूएम जहाज मुंबईत दाखल झाले आहे.ग्रीसहून मुंबईत आणल्या गेलेल्या बोटीची ३०० हन अधिक लहान-मोठी वाहने व तितकेच प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. एका फेरीत ५00 प्रवासी व १४५ गाड्यांचा ताफा वाहन नेण्याची क्षमता असलेली ही रो-पॅक्स बोट ग्रीस येथून मागवण्यात आली आहे. या फेरीसाठी 'एम टू एम फेरिज प्रायव्हेट लिमिटेड' (एमएफपीएल) या कंपनीने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड अणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यासोबत संयुक्त करार केला असून त्या माध्यमातून मुंबईचा जलमार्ग वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे. ही फेरी दर तीन तासांनी उपलब्ध असणार असून याबाबतचे वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. या सेवेची एकेरी आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे भाऊचा धक्का अणि मांडवा जेट्टी येथे उपलब्ध करण्यात येतील. जेट्टी रो-रो सेवा सुरु
box
भाऊचा धक्का ते अलिबागमधील मांडवा हे १२५ किलोमीटरचे अंतर रस्त्याने गाठण्यासाठी सध्या तीन ते चार तासांचा कालावधी लागतो. मात्र रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर केवळ एका तासातच मांडवा गाठता येणार आहे. ऑनलाइन बुकिंग १९ मार्चपासून घरी किंवा कार्यालयात बसून तिकिटे खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी www.m2mferries.com ही वेबसाइट उपलब्ध करण्यात आली आहे. ही वेबसाइट १९ मार्चपासून सुरू होणार आहे.