नवी मुंबई (प्रतिनिधी)- होळी व धूलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नवी मुंबईतील एपीएमसीव इतर विविध ठिकाणच्या बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. धुलीवंदनाच्या सण काही दिवसावर येऊन ठेपला असताना होळीच्या पार्शवभूमीवर नवी मुंबईत बाजारपेठा फुलल्या आहेत. लहान मुलांच्या पिचकारी खरेदीकरिता ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणार्या विविध प्रकारच्या पिचकर्यांनी बाजारपेठ फुलली आहे. विशेष म्हणजे रायफायची प्रतिकृती असलेली पिचकारी बाजारात उपलब्ध झाली आहे. लहान मुलामध्ये या पिचकारीचे आकर्षण पाहायला मिळत आहे. बाजारात रंगाचे, पिचकार्यांचे दर वाढते असून नैसर्गिक रंगाला अधिक मागणी आहे. ५० ते ५०० रुपयांपर्यंत बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून यामध्ये विविध काढूसच्या पिचकाऱ्यांची क्रेज देखील याआधी बाजारात पाहायला मिळाली. विविध डिझाइनच्या पिचकारी तसेच पबजी पिचकारी उपलब्ध आहेत. धुलिवंदनचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नवी मुंबईतील बाजारपेठांमध्ये पर्यावरण पूरक रंग, विविध चिनी बनावटीच्या आकर्षक पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. रंगपंचमीचे वेध बच्चे कंपनीला लागले असून विविध आकर्षक पिचकाऱ्यांची खरेदी करण्यासाठी बाजारात त्यांची रेलचेल सुरू झाली आहे. बाजारपेठेत दाखल झालेल्या विविध आकर्षक रंगीत आणि रूपात आलेल्या पिचकाऱ्या लहान मुलांना भुरळ पाडत आहेत. तर यंदाही कार्टून्स पिचकाऱ्यांची चलती असून आपल्या आवडत्या कार्टूनची पिचकारी घेण्याकडे बालकांचा कल दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठा होळी व रंगपंचमीच्या स्वागतासाठी सजल्या असून एकीकडे महागाई वाढत असली तरीदेखील ग्राहकांची खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता सणावर महागाईचा काहीही परिणाम नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील दुकानदारांनी या सणाची जय्यत तयारी सुरू केली आहे. रंगामुळे त्वचेला इजा पोहोचू नये, निसर्गाचा समतोल बिघडू नये, म्हणून पर्यावरणपूरक रंग विक्रीसाठी ठेवले आहेत. त्या रंगांना ग्राहकांकडूनही मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. रंगांच्या किमती यंदा काहीसे वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कलर स्प्रे, हर्बल गुलाल, हर्बल लिक्विड, मॅजिक कलर, कॅप्सूल यांसारखे नवीन प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. रंगांची उधळण करण्यासाठी विविध आकाराच्या चिनी बनावटीच्या पिचकाऱ्याही मोठया प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मोठ्या आकाराच्या पिचकाऱ्याची किंमत वाढती असून बच्चे कंपनीचा कल खरेदी करण्याकडे आहे.
धूलिवंदननिमित्त बाजारपेठा सजल्या