वाशी (प्रतिनिधी) - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत 'शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी' तर्फे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नवी मुंबई परिसरातील वीरशैव लिंगायत समाजातील महिलांनी एकत्र येत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महात्मा बसवेश्वरांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी महिला सक्षमीकरणावर सर्व जणांनी आपआपली परखड मते मांडली. महात्मा बसवेश्वरांनी स्त्री स्वातंत्र्य व समानतेवर मांडलेल्या विचारांची आजच्या काळात खुप गरज असल्याच्या भावना अनेक महिलांनी व्यक्त केल्या. व महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेल्या मानवतावादी विचारांचा जागर करण्याचे ठरविले. तसेच सर्व जण मिळून पारंपारिक खेळाचा आनंदही लुटला. यावेळी सर्व महिलांसाठी रूचकर जेवणाचे आयोजन केले होते. संपूर्ण सजावट आणि सदर कार्यक्रमाची तयारी संस्थेच्या महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन केला होता. यावेळी, 'अक्कमहादेवी महिला मंडळ' स्थापन केले गेले आणि त्या माध्यमातून सर्व महिलांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करण्याचे आव्हान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुळा हिरेमठ यांनी अतिशय सुंदर पध्दतीने केले. यावेळी त्यांच्यासह इतर सर्व सदस्य आणि पदाधिका-यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची मेहनत घेतली. संस्थेतर्फे उपस्थित सर्व महिलांना भेट म्हणून एक एक तुळशीचे रोप देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
शरण संकुलतर्फे नवी मुंबईत महिला दिन उत्साहात साजरा