मुंबई (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्या बाहेरुन एका कुख्यात गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह त्याला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. इर्शाद खान असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे. बेकायदेशीर पिस्तुलाची विक्री करण्यासाठी तो कलानगर परिसरात आला होता. वांद्रे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. दरोडेखोर इर्शाद खान याच्यावर मुंबईसह, गुजरात राज्यात खून, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, बेकायदेशीर पिस्तुल बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. इर्शाद कलानगर येथील म्हाडा कार्यालयाच्या पाठीमागील संरक्षण भिंतीजवळ असलेल्या फुटपाथवर उभा होता. मातोश्रीपासून ही जागा १०० मीटर अंतरावर आहे. तो या ठिकाणी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. इर्शाद खान याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि ७ जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. इर्शाद याठिकाणी कोणाला पिस्तुल विकण्यासाठी आला होता, त्याने पिस्तुल आणि काडतुसं कुठून आणली होती याची चौकशी पोलीस करत आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-९ ने केलेल्या कामगिरीमुळे भविष्यात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना बाहेरून पिस्तुलासह गुडाला अटक
• Dainik Lokdrushti Team