उलव्यात भरदिवसा महिलेचे अपहरण करुन हत्या


नवी मुंबई (प्रतिनिधी)- उलवे नोंडमध्ये काल भरदिवसा एका महिलेचे अपहरण करून तिची गोळ्या घालून निघृण हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत हकीकत अशी कि, शेलघर गावचे रहिवासी असलेले व सक्सेस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरज भगत हे त्यांच्या आईसह नातेवाईकाच्या लग्नाला कारने निघाले होते. यावेळी वहाळ गावाजवळील त्यांची कार आली असता, अभ्युदया बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी सुरज भगत यांनी आपली कार थांबवली. मात्र, त्याने कार चालूच ठेऊन एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. यावेळी कारमध्ये भगत यांची आई प्रभावती भगत या एकट्याच बसल्या होत्या. प्रभावती यांना एकटे बघून चोरट्यांनी कारमध्ये शिरून कारसह प्रभावती यांचे अपहरण करून काही अंतरावरील निर्मनुष्य ठिकाण बघून चोरट्यांनी प्रभावती यांच्या अंगाव _घेतले आणि त्यांच्यावर गोळीबार करून नंतर गाडी उलव्यामधील सेक्टर २४ मध्ये सोडून ते पसार झाले. प्रभावती यांच्या अंगावरील दागिने गायब असल्याने चोरीच्या हेतूने ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पुढील तपास सुरु केला आहे.