प्रा. डॉ.एन.डी. पाटील यांना जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान


पनवेल (प्रतिनिधी)- प्रा.डॉ. एन.डी. पाटील यांचे जीवन म्हणजे अखंड संघर्ष असून हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे चळवळीचे शास्त्र आणि शस्त्र स्वतःच्या कृतीतून विकसित करणारे विधायक संघर्षाचे प्रा. एन.डी. पाटील यांना जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव प्रदान करताना अतिशय आनंद होत असून संघर्षाच्या लोकनायकाचा गौरव __स्फूर्तीदायी आहे, असे मत राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खांदा कॉलनी येथे व्यक्त केले. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे काल संपन्न झाला. या सोहळ्यात स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ पहिल्या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा ना.दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ना.दिलीप वळसे पाटील बोलत होते. रोख रक्कम रु.पाच लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, सोहळ्याचे संयोजक व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खा.रामशेठ ठाकर, संचालक शकुंतला ठाकूर, आ.प्रशांत ठाकूर, ना. आदिती तटकरेखा.श्रीरंग बारणे, माजी मंत्री आशिष शेलार, रविंद्र चव्हाणआ.महेश बालदी, एन.डी. पाटील यांच्या सुविद्य पत्नी सरोजिनी पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, परेश ठाकूरवर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगिरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आदींसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ना.दिलीप वळसे पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले किजनार्दन भगत साहेबांच्या कार्याचा आणि योगदानाचा मी आढावा घेतला, त्यांचे कार्य समाजासाठी आणि फक्त समाजासाठीच होते आणि महान होते. या सोहळ्याचे संयोजक माजी खा.रामशेठ ठाकूर, आ.प्रशांत ठाकूर व निवड समितीने आज भगत साहेबांच्या नावाने जो जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्कारासाठी थोर विचारवंत एन.डी. पाटील या समर्थ व्यक्तिमत्वाची निवड केली त्याबद्दल त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. विचारांची निष्ठा जपणारे व्यक्तिमत्व म्हणून एन.डी. पाटील यांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहेक्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गावी एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये एन.डी. पाटील यांचा जन्म दि. १५ जुलै १९२९ रोजी झाला. शाहू-फुले-आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याला प्रभावित झालेला हा काळ असताना त्या वेळेला शिक्षण घेत असताना प्रचंड वाचन उत्तुंग ध्येयवाद आणि समर्पित जीवन जगण्याची अभिलाषा असलेल्या शिक्षकांचा सहवास त्यांना लाभला हा त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊन गेला. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आयुष्यामध्ये महत्त्वाचा तो टप्पा ठरला. अशी आठवण ना. दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी करुन दिली. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, खा. श्रीरंग बारणे राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याचे माजी मंत्री आशिष शेलार आदींची यावेळी भाषणे झाली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खा.रामशेठ ठाकूर म्हणाले की, स्व.जनार्दन भगत साहेब आपल्यातून गेल्याला बत्तीस वर्षे झाली. त्यांची पुण्यतिथी प्रत्येक ७ मे रोजी आम्ही साजरी करत असतो, पण जयंतीचा सोहळा प्रथमच मोठ्या प्रमाणात आजच साजरा करीत आहोत. भगत साहेब आणि प्रा.डॉ.एन. डी.पाटील हे दोघेही समवयस्क. दोघांचाही जन्म १९२८ सालचा पण स्व.जनार्दन भगत यांचा जन्म २९ फेब्रुवारीला असल्याने त्यांची जयंती चार वर्षांनी येते, आज तो सुवर्ण दिवस आहे. स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील यांना प्रदान करीत आहोत, याचा अतिशय आनंद होत आहे. रायगड जिल्ह्याला विशेष करून पनवेल व उरण तालुक्याच्या दृष्टीने जनार्दन भगत साहेब आमचे कर्मवीर'. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या व आज शतक महोत्सव साजरा करीत असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे रोपटे प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली स्व.दि.बा. पाटील यांच्या मदतीने गव्हाण, जासई, फंडे, नावडे, वावंजे सारख्या असंख्य ठिकाणी शिक्षणाची गंगा आणणारे आमच दवदूत हात. वयाच्या १४-१५ वर्षापासून त्यांनी 'चलेजाव' चळवळीत भाग घेतला तर २७-२८ वर्षांचे असतानाच बेळगाव कारवार सीमा प्रश्नासाठी तुरुंगवास भोगला. पनवेल उरण तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी विशेषत: शेतकऱ्यांसाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात ते कणखरपणे लढले. न्याय हक्क मिळवण्यासाठी सतत संघर्ष करत राहिले. मोर्चे, आंदोलने करीत स्वतःच्या संसाराकडे, मुलाबाळांकडे पाठ फिरवून सामाजिक कामात रमले. १९६०-६२ सालापर्यंत पनवेल उरण तालुक्यात पनवेल उरण दोन शहरे सोडल्यास कुठेही हायस्कूलच्या शिक्षणाचीही सोय नव्हती. स्व.जनार्दन भगत यांनी कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था या भागात आणली नसती तर आज आम्ही ह्या भागातील मंडळी स्टेजवर ढिसलो नसतो, असे भावपूर्ण उद्गार माजी खा. रामशेठ ठाकूर यांनी काढले. आमच्या शालेय जीवनात, तरुणपणात अर्थातच १९६० ते १९९० च्या काळातील आमचे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आणि भगत साहेब व प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील साहेबांकडे पाहत होतो, असेही ते म्हणाले. सदरचा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन माजी खा.रामशेठ ठाकूर यांनी स्वतः विशेष लक्ष दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संचालक आ.प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे यांच्यासह संचालक मंडळ व सहकारी यांनी समारंभ यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत