नवी मुंबई (प्रतिनिधी) जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे व्यापार- पर्यटन, चित्रपट व इतर विविध व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला असतानाच आता 'कोरोना'च्या धास्तीमुळे धुमधडाक्यात लग्न करण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. अनेकांनी तर मार्च व एप्रिल महिन्यांत ठरवलेली लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचे नियोजन सुरू केले असल्याचे समजते. विवाह ही प्रत्येकाच्याच आयुष्यातली एक महत्त्वाची घटना असते. आयुष्यातील हा दिवस अधिकच स्पेशल करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन केले जातात. लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर ज्यांच्या घरी हा सोहळा असतो, त्यांच्याकडून लग्नाची शॉपिंग, लग्नपत्रिका छापणे, त्यांचे वाटप करणे अशी कामे जोराने सुरू होतात. यंदा मार्च व एप्रिल महिन्यामध्येही लग्नाचे मुहर्त आहेत; मात्र, आता या मुहूर्तावर धुमधडाक्यात लग्न करण्याचे स्वप्नावर विरजण पडण्याची __शक्यता आहे. त्यामुळे आता काहींनी आहे त्याच मुहर्तावर __जवळच्या नातेवाईकांना बोलावून लग्न उरकण्याचे ठरवले आहे, तर अनेकांनी एप्रिल महिन्यानंतर दस-या मुहूर्तावर लग्न करण्याचे नियोजन सुरू केले आहे. दरम्यान, अनेकांनी आता आमच्याकडे मे किंवा जून महिन्यात एखादी लग्मतिथ आहे का, याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तर, यापूर्वी ज्यांनी मार्च व एप्रिल महिन्यांतील मुहूर्त काढले आहेत, त्यापैकी काही जणांनी त्याच दिवशी थोड्या लोकांना बोलावून लग्नसोहळा उरकून घेऊ, असे ठरवले आहे.' असे _ याविषयी बोलताना पुरोहित सांगतात. तर लग्नाचे फोटो व व्हिडिओ शुटिंगची ऑर्डर काही महिने अगोदरच बुक केली जाते. परंतु, आता 'करोना'मुळे बरेच जण लग्नसोहळा पुढे ढकलण्याचे नियोजन करीत असून तशी आम्हाला माहितीसुद्धा देत आहेत असे याविषयी माहिती देताना फोटोग्राफर सुजित म्हात्रे यांनी सांगितले.
'कोरोना'मुळे यंदा 'कर्तव्य' लाबण्याची चिन्हे ?
• Dainik Lokdrushti Team