कोरोना राष्ट्रीय आपत्ती; मृतांच्या । कुटुंबीयांना मिळणार ४ लाखांची मदत

नवी दिल्ली - करोना विषाणूची लागण झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत देण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. या बरोबरच करोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या तसेच करोनाविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्यांनाही ही मदत दिली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. या बरोबरच, केंद्र सरकारने करोना विषाणूच्या भारतातील उद्रेकाला राष्ट्रीय संकटघोषित केले आहे. या मुळे देशातील सर्व राज्यांमधील सरकारे आता करोनाशी लढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषातून (एसडीआरएफ) मदत मिळवूशकतात असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने कोविड-१९ या आजाराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याचा निर्णय घेतला असून तसे केल्याने देशातील सर्व राज्य सरकार एसडीआरएफमधून आर्थिक सहाय्य मिळवू शकतील असे केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बरोबच मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणाही केंद्रीय गृहमंत्रालयाने केली.