उरण तालुक्यातील गावांमध्ये शिरतेय उधाणाचे पाणी!

होल्डींग पाँडस्चे फ्लॅप गेट काढून टाकल्याचा परिणाम



जेएनपीटी (वार्ताहर) - समुद्र खाडी किनाऱ्यालगत बसविण्यात आलेले होल्डींग पाँडचे फ्लॅप गेट सिडकोने काढून टाकल्याने समुद्रातील उधाणाचे पाणी सध्या उरण तालुक्यातील प्रूडे, डोंगरी पाणजे परिसरात शिरु लागले असल्याचे नागरीकांचे मत आहे. त्यामुळे भविष्यात समुद्रातील उधाणाचे पाणी गावात शिरुन गाव परिसर पाण्याखाली जाण्याची भीती असल्याने आधी सिडकोने काढून टाकलेले होल्डींग पाँडस्चे फ्लॅप गेट त्वरीत बसवावेत अशी मागणी या गावांच्या ग्रामपंचायतींमार्फत करण्यात येत आहे. उरण तालुक्यातील नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, चाणजे, बोकडविरा, भेंडखळ, नवघर, पागोटे, फुडे, डोंगरी, पाणजेसह इतर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला देशाच्या उन्नतीसाठी आपल्या शेतजमिनी अल्प किंमतीत संपादित करून दिल्या. त्यावेळी या परिसरातील शेतकन्यांना, प्रकल्पग्रस्तांना रोजगार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सिडकोने दिले. परंतु या आश्वासनाची पुर्तता सिडको प्रशासनाने न करता उलट समुद्र खाडी कि नान्यालगत बसविण्यात आलेले होल्डींग पाँडचे फ्लॅप गेट काढून टाकले. त्यामुळे समुद्राच्या उधाणाचे पाणी गाव परिसरात शिरून मोठ्या प्रमाणात खारफुटीची झाडे (जंगले) वाढून परिसर दुषित झाले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाढत्या खारफुटीच्या झाडांमूळे हळूहळू उधाणाचे पाणी गाव परिसरात शिरून रहिवाशांच्या घरातील जिवनाशक वस्तूंचे नुकसान होऊन आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे सिडको _बाधित ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांनी उरणच्या आमसभेत पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी सिडकोच्या प्रशासनाने होल्डींग पाँडचे फ्लॅप गेट त्वरीत बसवावेत अशी मागणी केली. परंतू प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा न समजून घेता, उलटशासनस्तरावर पत्रव्यवहार करणाऱ्या काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सिडकोने गाव परिसरात वाढलेल्या खारफुटीच्या झाडांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी आणि गावातील प्रकल्पग्रस्ताच्या घरात उधाणाचे पाणी शिरण्याच्या उद्देशाने उरले सूरलेले खाडी किनाऱ्यावरील होल्डिंग पाँडचे फ्लॅप गेट उघडले. सिडको प्रशासनाने गावातील