शहरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना बंदी

कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांचे उपाययोजनांचे आदेश


आदेशाचे पालन न केल्यास होणार कारवाई


नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम, १८९७ ची अंमलबजावणी १३ मार्चच्या अधिसूचनेनुसार सुरु करण्यात आलेली आहे. त्यानुसार करोना विषाणू प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रविवारी सकाळी महापालिका मुख्यालयात तातडीने विभागप्रमुखांची बैठक घेऊन महापालिका कार्य क्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच यापूर्वी परवानगी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात आली असून सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. नवी मुंबईमहापालिका आयुक्त केलेल्या आदेशान्वये -कोरोना विषाणूचा प्रसार होऊनयेयाकरिता खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी, बालवाडी, सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस, नाटयगृहे, सर्वगृहनिर्माण संस्था, हॉटेल व सार्वजनिक ठिकाणी असलेले जलतरण तलाव आणि व्यायामशाळा, जीम, मॉल्स, महापालिका बहउद्देशीय इमारतीमधील सभागृहे तसेच खाजगी मंगल कार्यालये व सभागृहे, हॉटेल्समधील बॅक्वेंट हॉल्स, सर्व क्रीडा संकुले, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे पुढील आदेश होईपर्यंत बंद राहतील. तथापि १० वी व १२ वीच्या परीक्षा तसेच विश्वविदयालयाच्या परीक्षा शासन आदेशानुसार निश्चित वेळेत विहित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आजारी विदयार्थी हे इतर विदयार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत याबाबत शिक्षण संस्था व व्यवस्थापनाने आवश्यक दक्षता व खबरदारी घ्यावयाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व उदयाने, पार्क, गार्डन ही क्षेत्रे प्रतिबंधीत करण्यात आली आहेत. शहरातील मैदाने, मोकळया जागा या ठिकाणी नियोजित कोणत्याही प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम व महोत्सव यांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला आहे. याशिवाय महत्वाचे म्हणजे कोरोना बाधित प्रदेशातून प्रवास करुन आलेल्या प्रवाशाने १४ दिवसांच्या कालावधीकरिता आरोग्य विभागाच्या सुचनांनुसार स्वत:च्या घरात अलगीकरण (केश टैरीरपीळपश) करुन राहणे बंधनकारक असणार आहे. केंद्र शासनामार्फत अलगीकरण संबधीच्या सूचनांचे काटकोरपणे पालन करणे गरजेचे असून तसे न केल्यास अशा प्रवाशांना राज्य शासनाने कार्यान्वीत केलेल्या अलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावयाची असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील कोणतीही व्यक्ती, संस्था तसेच संघटना यांनी या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (१८६० चे ४५) च्या कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील व या नियमावलीनुसार प्राधिकृत अधिकारी उपरोक्त नुसार व वेळोवेळी शासनाने या नियमानुसार दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणान्याविरुध्द दंडनीय कारवाई करण्यास सक्षम असणार आहे. हे आदेश तात्काळ अंमलात येत असून पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहतील असे नमूद करण्यात आले आहे.