आ.गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत भाजपाचा झेंडा फडकेल - अनंत सुतार

नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई शहराला विकासाच्या दूरदृष्टीचे नेते आ.गणेश नाईक यांचे नेतृत्व लाभले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्याच माध्यमातून भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास जैवविविधता समितीचे सभापती अनंत सुतार यांनी व्यक्त केला. ऐरोली येथील प्रभाग क्रमांक-१० आणि १२ मध्ये मागील सात दिवसांपासून हळदी-कुंकू चा कार्यक्रम मोठ्या गर्दीत होत आहे. समतानगर ऐरोली नाका भारतीय जनता पार्टी आणि अनंत प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य स्वरुपात हळदीकुंकू कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिकेच्या उद्यान व शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती तथा स्थानिक नगरसेविका शशिकला सुतार तसेच राजू शर्माबाबुलाल कुरेशी, सुभाष बोरकरउमेश पाटील, महेश घुले, विनायकमहम्मद कुरेशी यांच्यासह पदाधिकारी महिला वर्ग उपस्थित होता.