नवी मुंबई (प्रतिनिधी) - होळी व धुलीवंदन सणानिमित्त शहरात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. होळी व रंगांचा सण धुलीवंदन हा जुने वैमनस्य विसरून प्रेमभाव जपण्याचा सण. मात्र, मद्याच्या आहारी गेलेल्यांनी या सणाचे रूपच पालटून टाकले आहे. मद्यप्राशनमांसाहार तसेच नशेत धुंद राहून शांतता भंग करण्याचे प्रकार या सणांमध्ये सर्रास वाढीस लागले आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलीस तत्पर आहेतखबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यंदा दि. ९ मार्च रोजी होळी व दि.१० मार्च रोजी धुलीवंदन सण साजरा होणार आहे. सणांच्या या कालावधीतच यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा असल्याने हे सण साजरे करताना मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ध्वनिक्षेपणाच्या आवाजाच्या मर्यादेचे कोणीही उल्लंघन करू नये तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना या आवाजाचा त्रास होणार नाही याची खबरदारी सर्वानी घ्यावी असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे. मंडळांनी विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच विनापरवानगी मिरवणूक, ध्वनिक्षेपक आढळल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहेएकंदरीत संघटना, मंडळांनी व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून संयमाने व शिस्तीने होळी व धूलिवंदन सण साजरे करावेत असे आव्हान नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.
होळी, धूलिवंदन सण शिस्तीत साजरा करण्याचे नवी मुंबई पोलिसांचे आवाहन