स्वच्छतेबरोबर शिस्तीचे डोसही हवेत!

नवी मुंबईचा लौकीक वाढण्यासाठी आणि विशेषतदेशात स्वच्छतेत अव्वल ठरण्यासाठी महापालिकेच्यावतीने गेली ३-४ वर्षांपासून कमालिचे प्रयत्न सुरु आहेत; त्यात समाधानकारक यश आले असून स्वच्छ शहर, सुंदर भारत या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आधी आठवा आणि नंतरच्या वर्षात सातवा क्रमांक मिळविण्यात शहराला यश आले. गेल्या वर्षभराच्या कालावधीतही स्वच्छता व इतर बाबतीत शहर अग्रेसर राहण्यासाठी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असून विद्यार्थी, नागरीकांना सहभागी करुन घेतले जात आहे. नवी मुंबई हे शहर आता चांगल्या प्रकारे नावारुपास आले आहेअनेकविध सोयीसुविधा शहरात आहेत आणि लोकांना राहण्यायोग्य शहर म्हणूनही गौरविले आहे. अशा पार्श्वभूमीवर बेकायदा वाहन पार्कीग करणे, पदपथावर अनधिकृतपणे दुकाने थाटणे, अतिक्रमणे-अनधिकृत बांधकामे करणे, बंदी असतांनाही प्लास्टिक पिशव्याथर्माकोलचा वापर होणे, त्यांचे उत्पादन होणे यासह अन्य काही प्रश्न कायम असून यामुळे शहर स्वच्छतेला बाधा येते आणि शहराच्या सौंदर्याकरणाला गालबोट लागते. अशा लोकांवर कारवाई होतेही, ती अधिक कडकपणे केली जावीत्यासाठी शिस्तीचे डोसही दिले जावेत, तरच अशा प्रकारांना पायबंद बसू शकतो. स्वच्छतेत दोन वर्षांपूर्वी आठव्या क्रमांकावर असलेले व देशात अग्रस्थानी जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबईला एक पायरी वरचे स्थान मिळत सातवा क्रमांक मिळाला आहे, ही बाबसुध्दा समाधान आणि आनंद मानून घ्यावयास लावणारी आहे आणि शहरवासीयांना अभिमान वाटावी अशीही ठरलीआधीच्या तुललनेत नवी मुंबई महापालिकेने शहरातील स्वच्छता विषयक मोहिम अधिक गतीमान करायचे तेवढे नक्कीच चांगले प्रयत्न केले व त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून सातवा क्रमांक आला आणि राज्यातील अव्वल क्रमांकही टिकविला ही बाब महत्वाची ठरली. त्यावेळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सुंदर शहरांच्या प्रतिनिधींना गौरविण्यात आले. गेल्या वर्षभरातही महापालिकेने स्वच्छता विषयक केलेल्या कामांना, उपक्रमांनाजनतेने आणि सोसायट्या, हॉटेल्स अशा विविध घटकांनीही स्वयंस्फूर्तीनेही आणि काहींनी दंडाच्या भीतीपोटीही स्वच्छतेच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेतली त्याचे दृश्य परिणाम दिसून येत आहेत. सोसायट्या, नागरीक हेही महापालिकेच्या आवाहनास सहकार्य करीत आणि स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होत आहेत. महापालिकेमार्फत स्वच्छता संदेश आदीसाठी राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय राहिला आहे; विविध उपक्रम, कार्यक्रमांमध्ये असलेला सहभाग महत्वपूर्ण ठरला आहे. वर्षभरात नवी मुंबई स्वच्छतेत पुढे जात असल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिका आयुक्तांसह प्रशासनातील अधिकारी हे शहरातील शौचालयेउद्याने, मोकळी मैदाने, रस्त्यांवरील डेब्रिज, अर्धवट अवस्थेतील कामे, गटर, अस्वच्छतेची ठिकाणे यासह अन्य ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत तेथील अडचणी समजून घेत संबंधीत कार्यवाहीच्यादृष्टीने प्रयत्नशील असतात; संबंधीत कामे होण्याकडे लक्ष दिले जात आहे. ओला कचरा-सुका कचरा वेगळा करण्यापासून ते त्याचजागी प्रक्रियाकरीता खतनिर्मिती प्रकल्प राबविणे असे धोरण अंमलात आणले त्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, सहकार्य केले जात आहेजनतेत जागृती करण्यापासून ते कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे येथील स्वच्छतेकडे लक्ष दिले; लोकप्रतिनिधीजनता, विद्यार्थी, स्वच्छता कर्मचारी, अन्य सहकारी व्यक्तीसंस्था, संघटना यांची मदत घेतली आणि जेथे प्रेमाने वा आवाहनाने कामे होत नाहीत तेथे प्रशासनाने दंडात्मक कारवाईही केली. या साऱ्याचा सकारात्मक परिणाम होत आहेमात्र शहर स्वच्छतेला बाधा आणणाऱ्या, सौंदर्गीकरणाला गालबोट लावणाऱ्यांना आता शिस्तीचे डोसही दिले जावेत!