पनवेल (प्रतिनिधी)-खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरच्या भूखंडावर आवास योजनेच्या इमारतीचे काम सुरु झाल्यावर सामाजिक संघटनांनी आंदोलन छेडले होते. शेतकरी कामगार पक्षासह अन्य राजकीय पक्षांनी सुद्धा या प्रकल्पाला विरोध केल्याने या आंदोलनाला जनआंदोलनाचे रूप आले होते. पालकमंत्री अदिती तटकरे, खा.सुनील तटकरे, नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.बाळाराम पाटील, पनवेल महापालिका विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी ग्राउंड झिरोवर येत पाहणी __केली आणि याठिकाणी बस टर्मिनल होणे गरजेचे आहे व ते होणारच अशी भूमिका मांडली. यावेळी उपस्थित मंत्री महोदयांनी नागरिकांच्या भावनांची दखल घेण्याची ग्वाही दिली. कामोठे येथील सेक्टर-२८ मधील भूखंडावर काही दिवसांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे काम सुरु झाले. पत्रे । ठोकल्यावर नागरीकांच्यात अस्वस्थता वाढली, कारण या ठिकाणी बस टर्मिनल आणि पार्किंगसाठी हा भूखंड राखीव होता. सेवाभावी संस्थांनी आणि शेकापसह अन्य राजकीय पक्षांनी विरोध केल्यामुळे हा प्रकल्प वादग्रस्त बनला. सिटीझन्स यूनिटी फोरम पनवेल, एकता सामाजिक संस्था व कामोठ्याच्या नागरी हक्कसमितीने काही दिवसांपूर्वीच खा. सुनील तटकरे यांची _भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपण पालकमंत्री आदिती तटकरे आणि सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत _आश्वासन दिले होते. त्यानुसार खा.सुनील तटकरे यांनी पालकमंत्री आदिती तटकरे, नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आमदार बाळाराम पाटील यांच्यासह सिडकोच्या अधिकाऱ्यांची एकत्रित भेट घेऊन येथील पाहणी केली. आवास योजनेला विरोध नसून वरोध नसून हा भूखंड रेल्वे स्थानकानजीक असल्याने प्रस्तावित बस टर्मिनल पार्किंग हे नियोजन संयुक्तिक असल्याचे नागरीकांनी मान्यवरांना पटवून दिले. यावर खासदार सुनील तटकरे यांनी नियोजित जागा त्याच कारणासाठी वापरली गेली पाहिजे अशी भूमिका मांडली आणि आवास योजनेसाठी नजीकच्या ठिकाणी अन्य भूखंड उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा असा सुवर्णमध्य सुचविलात्यानुसार नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत पालकमंत्री अदिती तटकरे, आ.बाळाराम पाटील आणि प्राजक्त तनपुरे हे बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पमपा विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, शेकाप नगरसेवक हरेश केणी, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आर.सी. घरत, शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील, पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रस्तावित बस टर्मिनलच्या जागेवरची आवास योजना होणार रद्द