नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. देशासमोर उद्भवलेल्या आर्थिक आणि करोनाच्या संकटावर मात करण्याबद्दल चर्चा झाली. यावेळी कें द्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. _यापूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये सरकारनं महागाई भत्त्यात वाढ केली होती. केंद्राने त्यावेळी महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली होती. या निर्णयामुळे ५० लाख वेतनधारक कर्मचारी आणि ६२ पेन्शनधारकाना लाभ झाला. तर तब्बल १६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला होता. चार टक्के वाढ करण्यात आल्यामुळे भत्ता २१ टक्के झाला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
• Dainik Lokdrushti Team