कामोठे (प्रतिनिधी) - कामोठ्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाची प्रकृतीउत्तम असल्याची माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. कामोठ्यातील कोरोनाग्रस्त रुग्णास मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. सदर रुग्णाची आजच्या घडीला प्रकृती उत्तम असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे व आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
रुग्णाची प्रकृती उत्तम कामोठ्यातील कोरोनाग्रस्त