नवी मुंबई (प्रतिनिधी) - सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या खटल्याच्या सुनावणीस अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी तत्कालीन सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या न्यायालयात साक्ष नोंदविण्यास नकार दिल्यामुळे हा खटला आता सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला असून या खटल्याचे कामकाज आत्ता वेगात सुरू झाले आहे. काल पनवेलच्या सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात या खटल्याची सलग चार तास मॅरेथॉन सुनावणी झाली. न्यायालयाने या खटल्यातील मुख्य साक्षीदार अश्विनी यांचे पती राजू गोरे यांची सरतपासणी एकाच दिवसात उरकून त्यांची उलटतपासणीही सुरू केली. तसेच यावेळी या खटल्यातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांची शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान पनवेल सत्र न्यायालयात ओळखपरेड घेण्यात आली. अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी या दोन्ही आरोपींना ओळखले. या खटल्याची पुढील सुनावणी आता येत्या ६ मार्च रोजी होणार आहे. अश्विनी बिद्रे हत्याकांडातील पहिले व मुख्य साक्षीदार आणि अश्विनी यांचे भाऊ आनंद बिद्रे यांची सरतपासणी आणि उलटतपासणी पनवेल न्यायालयात सुमारे दोन ते अडीच महिने सुरू होता. आनद बिद्रे याची उलटतपासणी संपल्यानंतर शुक्रवारी पनवेल सत्र न्यायालयात न्यामाधुरी आनंद यांच्या न्यायालयात दसरे साक्षीदार अश्विनी यांचे पती राजू गोरे यांची सरतपासणी व त्यानंतर उलटतपासणीदेखील सुरू झाली. यावेळी न्यायाधीशांनी कोणतीही सबब ऐकून न घेता सलग चार तासात मॅरेथॉन सुनावणी पूर्ण करून त्यांच्या उलट तपासणीला सुरुवात केली. यावेळी या खटल्यातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांची शुक्र वारच्या सुनावणीदरम्यान पनवेल सत्र न्यायालयात ओळखपरेड घेण्यात आली. अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी या दोन्ही आरोपींना ओळखलेदरम्यान, या खटल्याचे कामकाज वेगात सुरू झाल्यामुळे या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागेल, असा विश्वास राजु गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
पो.अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण... आरोपी कुरुंदकरसह राजेश पाटील याची न्यायालयात ओळखपरेड