जेएनपीटी (वार्ताहर) - प्रसूती दरम्यान वेदनाने कासावीस झालेल्या गायीला उरण पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केल्याने गायीने जन्म दिलेल्या नवजात दोन वासरांसह गायीला जीवनदान मिळाले आहे. ___मोठी जुई गावातील रहिवासी असलेल्या दशरथ कामोटकर यांना मागील वर्षी शाँक लागल्याने झालेल्या अपघातात दशरथ कामोटकर यांचे दोन्ही हात निकामी झाले होते. त्यामूळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दशरथ कामोटकर यानी दुध व्यवसाय सुरू करण्यासाठी गायीचे पालन सुरू के ले.दुध व्यवसायातील गाय गरोदर असल्याने आणि गुरुवारी प्रसूती दरम्यान वेदनाने सदर गाय कासावीस झाल्याने घाबरलेल्या कामोटकर कुटुंबानी सदर घटनेची माहिती उरण पशुसंवर्धन विभागाचे डॉ.संतोष सिंग धाबेराव आणि डॉ. धांडे यांना दिली. पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी प्रसंग ओळखून दशरथ कामोटकर यांच्या घराजवळ येऊन प्रसूती दरम्यान वेदनाने कासावीस झालेल्या गायीवर तात्काळ उपचार सुरू केले आणि दोन नवजात वासरांना जीवनदान दिले. त्यामुळे मोठी जुई गावातील महिलांनी पशुसंवर्धन विभागाच्या या डॉक्टरांचे आभार मानले. साजरा
पश वैद्याने दिले दोन नवजात वासरासह गायीला जीवदान