खारघर (वार्ताहर) - रिक्ष । च । ल क [या प्रामाणिकपणामुळे रिक्षात हरवलेली १ लाख ५२ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग प्रवाशाला परत मिळाली आहे. खारघरमध्ये हा प्रकार घडला असून सुरजकुमार अजय झा,(वय २२) असेप्रामाणिकपणा दाखविणाऱ्या रिक्षाचालकाने नाव आहे. रिक्षाचालक सुरजकुमार अजय झा याच्या या प्रामाणिकपणाबद्दल खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार तसेच पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले. रिक्षाचालक झा याच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वस्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. मूळचे नांदेडमधील रहिवाशी असलेले सुरेश पांडुरंग सांगळे हे दिनांक ६ मार्च रोजी तळोजा येथून खारघर येथे रिक्षाने (एमएच-४३-एसी- ३७९९) प्रवास करत असताना १ लाख ५२ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली त्यांची बॅग ते रिक्षामध्ये विसरले. सदरची ही बाब रिक्षाचालक सुरजकुमार झा याच्या अचानक लक्षात आली असता, यानंतर त्याने तातडीने खारघर पोलीस ठाणे गाठत ड्युटी ऑफिसर सहाय्यक । पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्याकडे सदरची बॅग जमा केली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी बॅग उघडून पहिली असता, त्यात १ लाख ५२ हजार रुपये एवढी रोख रक्कम असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सदर बॅग मालकाचा शोध घेऊन सदर बॅग व १ लाख ५२ हजार रुपये एवढी रोख रक्कम ही मूळ मालक सुरेश सांगळे यांना परत करण्यात आली.
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा नांदेडमधील गृहस्थाला परत मिळाली 'लाख'मोलाची रक्कम