जेएनपीटी (वार्ताहर) - कोरोनाच्या विषाणूचे संकट संपूर्ण जगासमोर आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव उरण तालुक्यात होऊ नये यासाठी प्रथमतः नागरीकांनी अफवांवर विश्वास न ठेवता एकजुटीने या संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागपोलीस यंत्रणा व इतर प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन उरण तालुका तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी केले आहे. मुंबई शहराच्या हाके च्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचे महत्त्वाचे प्रकल्प असून या प्रकल्पात तसेच घारापुरी बेटावर देश परदेशातील अनेक नागरिक येत असतात. तसेच सध्या लग्न समारंभ सोहळे साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे लग्न समारंभ प्रसंगी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन काही अंशी निर्बंध घालण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी वधू-वर पक्षाच्या नातेवाईक, मित्र परिवार मंडळाने प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. तसेच बाजार पेठेतील वाढती गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. नागरीकांनी चूक कोणाची याची चर्चा करण्यापेक्षा एकजुटीने कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्याचा निर्धार अंगी बाळगुन नागरीकांनी शासनस्तरावरून सातत्याने होणाऱ्या सुचनाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शेवटी तहसीलदार भाऊसाहेब । अंधारे यांनी उरणच्या जनतेला । केले आहे.
कोरोना विरूध्दची लढाई जिंकण्यासाठी नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे - तहसीलदार अंधारे