नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या आरोग्य विभागाकडून उलवे नोड याठिकाणी करण्यात आलेल्या प्लास्टिक विरोधी कारवाईत तब्बल ९00 किलो प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे. सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर बी.एस. बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली व आरोग्य अधिकारी नंदकिशोर परब यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य विभागाचे अधिकारी पोखरकर, जांबवडेकर, मस्के या अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या पथकाने उलवे भागातील हॉटेल, दुकाने, किराणा स्टोअर, शॉपिंग मॉल अशा जवळपास ३० ठिकाणी धाडी टाकून सुमारे ९०० किलो इतका प्लास्टिक साठा जप्त केला. दरम्यान, एकीकडे प्लास्टिक बंदी असताना शहरातील विविध ठिकाणी खुलेआम प्लास्टिकचा सर्रास मोठा वापर केला जात असल्याचे या कारवाईनंतर लक्षात कसे येते, असा सवाल रहिवाशी करीत आहेत.
सिडकोच्या आरोग्य विभागाची धडक कारवाई... उलवे नोडमधून ९०० किलोप्लास्टिक जप्त