कोरोनाच्या नायनाटासाठी तुर्भेत होम हवन


तुर्भे (प्रतिनिधी) - संपूर्ण जगभर थैमान घातलेला कोरोना हा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र विविध उपाययोजना केल्या जात असतानाच देशातून या विषाणूचा नायनाट व्हावा यासाठी काल तुर्भे येथील शरद पाटील व इतर ग्रामस्थ यांनी होम हवन आणि यज्ञ करून प्रार्थना केली. याविषयी माहिती देताना आयोजकांनी सांगितले कि, श्रीराम आणि लक्ष्मण यांनी राक्षसांचा नाश करण्यासाठी महर्षि विश्वामित्र तपोस्थळी येथे हवन यज्ञ पूर्ण केला त्याच प्रकारे जगात पसरलेल्या या कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी आम्ही हवन करून देवाकडे प्रार्थना केली. तसेच या विषाणूपासून बचाव करण्यासाठी तज्ञांनी सुचविलेल्या विविध उपाययोजना सर्व नागरिकांनी कराव्यात असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या संरक्षणासाठी सर्वानी आपले शरीर निरोगी ठेवले पाहिजे, गर्दीत जाणे टाळावे, प्रवास करताना मास्क अथवा रुमालाचा चेहऱ्यावर वापर करावा, हस्तांदोलन टाळावेबाहेरून आल्यानंतर जेवण करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवावेत, कोणत्याही प्रकारच्या आजारावर उपचार घेण्यासाठी निष्काळजीपणाने वागू नका असे आवाहन यावेळी करण्यात आले.