अपघातात वाहतूक पोलिसासह तिघे जखमी
नेरुळ (प्रतिनिधी)- पामबीच मार्गालगत असणाऱ्या नेरुळ से-२८ येथील गगनगिरी चौकात वाहतूक पोलिस एका रिक्षाची तपासणी करत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या कारने रिक्षाला व वाहतूक पोलिसाच्या दचाकीला जोराची धडक देण्याची घटना घडली. या अपघाती घटनेत वाहतूक पोलिस रिक्षाचालक व कारचालक असे तिघेजण किरकोळ __जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली. कारची धडक इतकी मोठी होती की भरधाव कार रस्त्यावर पलटी झाली. शनिवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची नोंद नेरुळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघाती घट ने नंतर घटनास्थळी दाखल झालेल्या जखमींना उपचारासाठी त्वरीत रुग्णालयात भरती करण्यात आले तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजुला उभी करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, नवी मुंबईचा क्वीन नेक लेस समजल्या जाणा-या पामबीच मार्गावर गेल्या काही दिवसांमध्ये अपघाती घटनांत वाढ _ झाली आहे. या मार्गावरुन वायुच्या वेगाने वाहने एकमेकांच्या पुढे नेण्याचे एकप्रकारे प्रकार सुरु असतात व पुढे या प्रकारातून पामबीच मार्गावर अपघात होत असल्यामुळे हे सर्व प्रकार रोखण्यासाठी तसेच वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाई सत्र हाती घ्यावे अशी मागणी होत आहे. |