मुंबई (प्रतिनिधी)- कोरोनामुळे महाराष्ट्रातला पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात __६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. दुबईवरून प्रवास करून ते भारतात आले होते. करोनाची लागण झालेल्या सदर व्यक्तीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. पण काल सकाळी त्यांचं निधन झालं. ही व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती. करोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. काल मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं. दरम्यान, पुण्यात आणखी एका करोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडल्याने राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० वर गेली आहे. भारतात करोनामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकात झाली होती. कर्नाटकमध्ये ७९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यात दिल्लीमधील राम मनोहर लोहिया रुग्णालयात ६८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.
मुंबईत वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू... राज्यात करोनाचा पहिला ४० वर!
• Dainik Lokdrushti Team