मुंबई (प्रतिनिधी)- कोरोनाची लागण रोखण्यासाठी एकीकडे सरकार, प्रशासन कामाला लागलं असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण मात्र रुग्णालयातून पळून जात आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांनी कॉरेंटाईन होणं गरजेचं असताना उलट हे रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट अशा रुग्णांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता कोरोना विलगीकरण कें द्रातून पळू न जाणाऱ्या रुग्णांवर पोलिसांकडून थेट कारवाई होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा रुग्णांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांनी दिले आहेत. वारंवार कोरोना विलगीकरण केंद्रातून रूग्ण पळून जाण्याचे वृत्त येत आहेत. हे त्यांच्याच नव्हे तर इतर नागरिकांच्या दृष्टीने ही धोकादायक आहे. पोलीस दलाला अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्रालय देत आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्रिटमध्ये म्हटले आहे.
'पळणाऱ्या रुग्णांवर पोलिसी कारवाई होणार -गृहमंत्री