जागरूकता नसल्याने तोंडासह दातांचे आजार वाढीस

आज जागतिक मुख स्वास्थ दिन; तपासणी करण्याचे तज्ञ डॉक्टरांचे आवाहन...



नवी मुंबई (प्रतिनिधी)- ज्या हास्यामुळे आपले व्यक्तिमत्व खुलते त्या चेहऱ्याबाबत म्हणजे आपल्या मौखिक आरोग्याबाबत जागरूकता आढळू न येत नाही. त्यामुळे भारतामध्ये तोंडाचे व दातांचे आजार मोठ्या प्रमाणात वाढीस लागले असल्याचे निदान तज्ञ डॉक्टरांनी केले असून मौखिक आरोग्य जपण्यासाठी काहीही खाल्यावर खळखळून चूळ भरावी इथपासून ते दर सहा महिन्यांनी दातांच्या डॉक्टरांकडून मशीनने दात स्वच्छ करून घेणे महत्वाचे असल्याचा सल्ला ते देतात. संपूर्ण जग कोरोनाशी संघर्ष करीत असलेल्या पार्श्वभूमीवर आज (दि.२० मार्च) साजऱ्या होणाऱ्या जागतिक मुख स्वास्थ दिनाचे महत्व फारच महत्वाचे आहे. त्यामुळे मौखिक आरोग्याचा विचार करता त्या चहन्याबाबत म्हणजे आपल्या आढळून येत नाही. त्यामुळे यामध्ये हिरड्यांचे आजार, दातांमध्ये कीड, किडलेल्या दातांमुळे जबड्यात होणारे आजार व मुखकर्करोग प्रामुख्याने दिसून येतात. आपले तोंड आपले आरोग्य राखण्यास मदत करते, कारण तोंडात ६०० प्रकारचे बॅक्टेरिया असतात, जे रक्तप्रवाहाद्वारे विविध अवयवांमध्ये पोहोचून समस्या निर्माण करतात, असे मौखिक आजाराशी संबंधीत तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. देशात तोंडाच्या कर्करोगामध्ये वेगाने वाढ होत आहे, अधिकतर मुख कर्करोग तंबाखूमुळे होतो, मग तो धुम्रपानामुळे असो किंवा तंबाखू चघळण्यामुळे, खर्रा किंवा गुटखा यांच्यातील पदार्थ अतिशय घातक असतात. मुख कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी तंबाखूचे सेवन सोडणे हे काळाची गरज आहे. असे मत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व हाणार आजार व मुखळळशन आपले आरोग्य राखण्यास मदत रिसर्च सेन्टरच्या दंतचिकीत्सक _डॉ.पूजा अग्रवाल यांनी आजच्या जागतिक मुख स्वास्थ दिनाचे महत्व सांगताना व्यक्त केले. मुखकर्करोगाची लक्षणे समजून घेणे आणि वैद्यकीय मदत महत्वाची ठरते. कोणताही न बरा होणार अल्सर, तोंडातून रक्त येणे, तोंड कमी प्रमाणात उघडणे, गळ्यात गाठी होणे, विनाकारण तोंड दुखणे, आवाजात बदल होणे, गिळताना त्रास होणे अशी काही चिन्हे आढळण्यास त्वरित ढंततज्ञांचा सला घेणे त्वरित दंततज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. आपल्या दातांची स्थिती आपल्या आरोग्यावर परिणाम करते कारण दातासंबंधित समस्या या शरीरातील इतर आरोग्याच्या समस्यांशी संबंधित असल्याचे डॉ.पूजा अग्रवाल म्हणाल्या. ___ दातांची वाढ पाच वर्षांपर्यंत आणि जबड्याच्या हाडांची वाढ वीस वर्षांपर्यंत होत असते. भारतीयांच्या दातांचे सरासरी आयुष्य हे अवघे ४० वर्षे आहे परंतु दातांची योग्य काळजी घेत नसल्याने ६० ते ७० टक्के भारतीय नागरिकांचे दात २५ ते ३० वर्षांमध्ये खराब होताना दिसत आहे व त्यामुळेच कृत्रिम दात बसविण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मौखिक आरोग्य जपण्यासाठी काहीही खाल्यावर खळखळून चूळ भरावी. जेणेकरून दातांमध्ये अडकलेले अन्नकण निघून जातील,दिवसातून दोन वेळा ब्रश करावा, ब्रश केल्यानंतर दररोज जीभही स्वच्छ करणं आवश्यक आहे. दररोज फ्लॉसिंग करणे महत्वाचे आहे त्यामुळे जेवणानंतर धाग्याने दातांमधील फटीत अडकलेले अन्नकण काढण्यास मदत होते.