मुंबई (प्रतिनिधी) - दहावीची राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा आज (दि.३)पासून सुरू होत आहे. सकाळच्या सत्रातला पेपर ११ वाजता सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी परीक्षा केंद्रात हजर राहणे आवश्यक असल्याने काही टिप्स महत्वाच्या ठरतील, अशी माहिती शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून देण्यात आलीपरीक्षा कक्षात परीक्षेच्या वेळेआधी अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे (उदाहरणार्थसकाळच्या सत्रात सकाळी १०.३० वाजता आणि दुपारच्या सत्रात दुपारी २.३० वाजता.) उपस्थित राहावेविद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन आकलन होण्यासाठी प्रश्नपत्रिका नियोजित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर दिली जाते. त्यामुळे वेळेत परीक्षा केंद्रात हजर असाल, तर तुमची कोणत्याही प्रकारची घाई होणान नाही. विद्यार्थ्यांनी हॉलतिकिट व उत्तरपत्रिकेवरील सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच उत्तरपत्रिका आणि पुरवण्या यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर बारकोडची छपाई करण्यात आली आहेयाची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच मुंबई बोर्डातील विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक ०२०-२७८८१०७५ २७८९३७५६ असा आहे.
आजपासून दहावीची परीक्षा