एपीएमसीतून १०० टन संत्री दुबईला रवाना

कोरोनामुळे नागपूर संत्र्याला जगभरातून मागणी



नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना व्हायरसचे थैमान सर्व क्षेत्रावर परिणाम करणारे ठरल्याचे चित्र एकीकडे असतानाच दुसरीकडे संत्रा उत्पादकांची मात्र करोनामुळे चलती झाली आहे. देशा अंतर्गत आणि आखाती देशात चढया भावाने संत्र्याचा पुरवठा होत असून व्हिटॅमिन सीयुक्त फळे खाण्याचा वैद्यकीय तज्ञांकडून दिला जाणारा सल्ला संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस दाखवत आहे. सध्या मुंबई एपीएमसी निर्यात भवनामधून आखाती देशात मोठ्या प्रमाणावर संत्री पाठविण्यात येत आहेत. संत्राची मंगणी जास्त असल्याने निर्यातदार संत्र्यांपाठवण्याकडे लक्ष देत आहेत. विमान प्रवास बंद झाल्याने समुद्रा मार्गी ही संत्री पाठविण्यात येत आहेत. समुद्री मार्गे संत्री पाठवण्यासाठी ३ ते ४ दिवस लागत असल्याने संत्रावर निर्यात भवनमध्ये योग्य प्रक्रिया केली जाते आहे. त्यामध्ये संत्र्याच्या पेटीवर निर्जंतुकीकरण, स्वच्छ धुणे, टेस्ट ले बल, उत्कृष्ठपणे पॅकिंग आदी नियोजनपुर्वक प्रक्रिया करून योग्य तापमानात सील बंद करून त्या पाठविल्या जात आहे. गेल्या दोन आठवडयापासून पाच कंटे नरमध्ये १०० टन नागपूर संत्री पाठवण्यात आली आहेत. सध्या ८०० टन संत्र्याची मागणी आखाती देशातून होत आहे. मात्र संत्री हाताळणी व निर्यातीकरीता योग्य साधन सामुग्री अधिक प्रमाणात उपलब्ध नसल्याने संत्री पाठविण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिस्थितीत सुधारणा होईल त्याच बरोबर संत्र्यांच्या निर्यातीचे टार्गेट पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पणन निर्यात अधिकाऱ्यांनी दिली. संत्र्यामळे रोग प्रतिकार शक्ती वाढते, आरोग्य सुधारण्यास मदत होते, असा डॉक्टरांचा सल्ला असल्याने संत्र्याची मागणी वाढण्या मागचे कारण ठरत आहे. संत्र्यातील पोषणमल्य आहारातन मिळाल्यास कोणत्याही रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढल्याने त्याचा फायदा होते.त्यामुळे सध्या २० हजार रुपये टनाने विकली जाणारी नागपुरी संत्री लवकरच ३५ हजार रुपये टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. नागपुरी संत्री प्रथमच दुबईत गेली आहे. त्यांची चव पाहून मागणी वाढल्याने नागपुरी संत्री' असे लेबल लावून ती विकण्यात येत आहे. अशी माहिती सत्रांनी दिली.