शिवसेनेने महानगर कंपनीचे गॅस पाईप टाकण्याचे काम पाडले बंद


वार्ताहर)- खांदा पनवेल (वार्ताहर)- खांदा वसाहत मध्ये अनेक महिन्यापासून महानगर गॅस कंपनीचे गॅस पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सिडकोची पाण्याची पाईप लाइन्स मागच्या महिन्यात काम करताना फुटल्याने संपूर्ण खांदा वसाहतीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली. महानगर गॅस कंपनीला काम बंद करावे, अशी मागणी होऊ लागली. सिडको प्रशासन खांदा वसाहत रस्त्याची बिकट अवस्था असताना सुद्धा काहीच हालचाल होत नसल्याने काल शिवसेनेच्या वतीने काम बंद पाडले. यावेळी खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के, विभागप्रमुख जयंत भगत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी गॅस पाइप लाईन्स काम झाले असेल त्या ठिकाणी सिडको प्रशासनाने रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. सध्या बारावी आणि पुढील आठवड्यात दहावीच्या परीक्षा सुरू होणार असून कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.