कोपरखैरण्यात उघड्या केबल, सबस्टेशनची दुरावस्था


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे प्रभाग समिती अंतर्गत असणा-या सेक्टर-६ येथील कै.अण्णासाहेब पाटील उद्यानातील महावितरणच्या जुन्या सबस्टेशनकडे महावितरणचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या सबस्टेशनच्या लोखंडी जाळ्यांना गंज चढून अनेक ठिकाणच्या जाळ्या तुटल्या आहेत. तर सब स्टेशनला जोडण्यासाठी टाकण्यात आलेल्या के बल उघड्याच असून या सबस्टेशन ला घाणीचा विळखा पडल्याने दुर्गंधीचा त्रास सोसावा लागत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. सदर सबस्टेशनचे दरवाजे तुटलेले असून ते कायम उघडेच असतात. त्यामुळे लहान मुलेगर्दुले, इतर कोणीही व्यक्ती आत जाऊ शकतो. त्या ठिकाणी असणा-या उघडया वायरींग व डीपीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी गर्दुले, समाजकं ट क ही या उघड्या सबस्टेशनचा गैरवापर करतात. उन्हाळा असो की पावसाळा या के बल उघड याच असतात. त्यामुळे जर अपघात झाला तर याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान महावितरणच्या अशा उघड्या व धोकादायक सबस्टेशनची लवकरात लवकर दुरुस्ती करावी व महापालिकेने स्वच्छ तेच्या अनुषंगाने साफ सफाई करावी, अशी मागणी कोपरखैरणे ई-प्रभाग समितीचे सदस्य डॉ.प्रतिक तांबे यांनी कोपरखैरणे येथील महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता व अतिरिक्त सहाय्यक अभियंता यांची भेट घेऊ न त्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.


box


कोपरखैरणे सेक्टर-परिसरातील सबस्टेशनची पाहणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. पाहणीनंतर या ठिकाणी सुरक्षा जाळयाफलक उभारणी व उघड्या के बलवर उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती महावितरणचे कोपरखैरणे सहा. अभियंता संजय काटकर यांनी दिली