नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनाचे विविध बाबीवर परिणाम होत असतानाच एपीएमसी बाजार पेठेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. काही वर्षापूर्वी चीन आणि भारताचे संबंध दरावल्याने तिथल्या वस्तूंना आपल्या बाजार पेठेत बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असले तरी काही प्रमाणात आजही चायनाच्या वस्तू भारतीय बाजारपेठेत बघायला मिळतात. त्यामुळे चायना बरोबरच इतर देशातील वस्तूबाबत हि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे बाजार पेठेवर मंदीचे सावट असून नेहमीच्या मानाने ३० ते ४० टक्के उलाढाल कमी झाली आहे. अगदी फळ भाजीपालापासून ते फळ बाजारात पूर्वी पाहावयास मिळणारी गर्दी आता त्यामानाने पाहावयास मिळत नाही. त्यामुळे एकंदरीत या परिस्थितीमुळे बाजार पेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाशीतील घाऊक बाजार पेठेत नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी देशातील कानाकोपऱ्यातून भाजीपाला, मसाला, कांदा-बटाटा व इतर माल येतो. इलेक्ट्रिकल वस्तू, गृह सजावटीच्या देशी, विदेशी वस्तूही येथे मिळू लागल्या आहेत. बाजारात आजवर नेहमीच प्रत्येक वस्तूमध्ये चिनी वस्तूचे अतिक्रमण पुढे राहिले आहे. त्यामुळे यात हि वायरस नाही ना अशी भीती सर्वांना वाटत आहे. त्यामुळे अनेक लोक खरेदी करत नसल्याची परिस्थिती आहे. बाजार पेठांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. इतर वस्तू खरेदी साठी हि लोक पुढे येत नाहीत. बाजारातील वस्तूमधून कोरोना विषाणू पसरत असल्याची अफवा अनेक ठिकाणी पसरली असल्याने हि परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. फळ भाजी बाजारातील गर्दी ओसरली असल्याचे दिसत आहे. आपल्याकडून परदेशात ज्या प्रमाणात भाजीपाला फळे निर्यात होतात त्याच प्रमाणे परदेशातून आपल्याकडे येणाऱ्या फळ आणि भाज्यांचे प्रमाण हि बर्यापैकी आहे. काही वर्षा पर्यंत तर यामध्ये चीन अग्रेसर राहिला आहेफळांच्या बाबतीत तर सर्वाधीक आयात फळे चीनमधून येत होती. यात ड्रॅगन फ्रुट, द्राक्षेवेगवेगळया प्रकारची सफरचंद, लिंबाच्या आकाराची संत्री हि चीनमधूनच येत होती. मात्र चार वर्षा पूर्वी चीनच्या कृषी मालाला आपल्या बाजार पेठेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चीनमधून येणारी आवक थांबली आहे. आता इतर युरोपीय देशांमधून हि आवक होत आहे. मात्र बाजारात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे परदेशी भाज्या आणि फळांना बाजारात मागणी कमी झाली आहे. तसेच किरकोळ व्यापारीही फळे घेत नसल्याने ३० ते ४० टक्केबाजारावर त्याचा परिणाम झाला असून मागणीत घट झाली असल्याचे फळ व्यापारी- रवींद्र ताजने यांनी सांगितले.
कोरोनाचे एपीएमसी बाजार पेठेवर परिणाम