यशवंतराव चव्हाण जयंती दिनी अभिवादन गावनजरातीतीशभिवादन


नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जयंती दिनानिमित्त काल महापालिका मुख्यालयात अॅम्पी थिएटर येथे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते प्रतिमापुजन संपन्न झाले. याप्रसंगी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते रविंद्र इथापे, नगरसेविका अनिता मानवतकरअतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी व सुरेंद्र पाटील, प्रशासन विभागाचे उप आयुक्त किरणराज यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक दयानंद निमकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभाव झुंजारे व वैद्यकिय अधिकारी डॉ. रत्नेश म्हात्रे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.