नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नवी मुंबईत विविध उपाययोजनांसह जनजागृती करण्यात असून सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा फैलावावर प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या दृष्टीने राज्य सरकारने १३ मार्चच्या मध्यरात्रीपासून करोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबईसह अन्य शहरातील सर्व जलतरण तलाव, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा इत्यादी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवी मुंबईत __याबाबतची कार्यवाही तातडीने __सुरु केल्याची तसेच संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात माहिती महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांस बायोमेट्रिक थम्ब इम्प्रेशन हजेरीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशा प्रकारचे आदेश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी निर्गमित केलेले आहेत. दि.१६ मार्चपासून महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयातील उपस्थितीची नोंद निश्चित हून अधिक डॉक्टर्सजा केलेल्या वेळेत बायोमेकि मशीन ऐवजी हजेरीपटावर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने याविषयी पूर्णत: खबरदारी घेण्यात येत असून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत महापालिका कार्यक्षेत्रातील असोसिएशनशी संलग्न सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे विशेष प्रशिक्षण शिबिर शनिवारी महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित २०० हून अधिक डॉक्टर्सना डॉ.विनायक म्हात्रे व डॉ. प्रतिक तांबे यांनी संबोधित केले. डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या सर्व रुग्णांना करोना विषाणू संसर्गाबाबत योग्य प्रकारचे आरोग्य शिक्षण देण्यास व मार्गदर्शन करा, अशी सूचना करतांनाच नागरिकांच्या मनातील याविषयीची भीती दूर करून त्यांना योग्य प्रकारची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे असे यावेळ करण्यात आले. महत्वाचे म्हणजे मास्क वापरण्याविषयी नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करून केवळ करोना रूग्णावर उपचार करणारया डॉक्टर्स व स्टाफने तसेच रुग्णाच्या संपर्कात राहणाऱ्या व्यक्तींनीच मास्क वापरावा याविषयी नागरिकांचे डॉक्टरांनी प्रबोधन करावे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनीही करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी साबण व पाणी वापरुन आपले हात नियमितपणे स्वच्छ धुवावेत, शिकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमालाचा वापर करावा तसेच मास्कचा प्रत्येकाने वापर करण्याची आवश्यकता नाही याविषयी नागिरकांना आश्वासित करावे असे खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांना आवाहन केले.
कोरोनाविरोधात नवी मुंबईत विविध उपाययोजनांसह जनजागृती
• Dainik Lokdrushti Team