नवी मुंबई (प्रतिनिधी) - सद्यस्थितीत जागतिक पातळीवर कोरोना विषाणमळे जिवित हानी झाली आहे. तसेच सदर विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातही झाला असून मुंबई, ठाणे व पुणे या ठिकाणी कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत व त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत, या पार्श्वभूमीवर शहरात गर्दी होतील अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे टाळावे तसेच गर्दीच्या ठिकाणीही उपस्थित राहण्याचे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन आयोजन महापालिका प्रशानाकडून करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिका शहर हे देखील अत्यंत गजबजलेले शहर असून या शहरात बाहेरुन नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या लोकांची संख्या मोठया प्रमाणात आहे. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करणेकरिता महापालिकेमार्फत शहरात विविध उपायायोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने शहरातील नागरिकांना __महापालिकेने आवाहन केले आहे. परदेशी जाण्याचे टाळावे व उपायायोजनालाल नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्यात यावा. तसेच शहरात गर्दी होणारे कार्यक्रम, स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धा, महिलांचे हळदी कुंकू समारंभ, शाळा व महाविद्यालय या ठिकाणी होणारे कार्यक्रम तसेच इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठया प्रमाणावर गर्दी होत असल्याने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे टाळण्यात यावे असे आवाहन नवी मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. असे
गर्दी होतील अशा कार्यक्रमांचे आयोजन नको! - महापालिका