जेएनपीटी (प्रतिनिधी)- उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक श्री. चाकूरकर यांचे माहे फेब्रुवारी २०१४ मध्ये अपघाती निधन झाले. त्यानंतर गेली सहा वर्षे वैद्यकीय अधीक्षकाऱ्या रिक्त झालेल्या पदावर नव्याने सर्जन, मेडिकल ऑफीसर तसेच अन्य महत्वाच्या पदावरील डॉक्टरांची नियुक्ती न केल्याने रुग्णालयात ये- जा करणाऱ्या गरीब रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहर तसेच तालुक्यातील रुग्णांसाठी उरण शहरात एकमेव इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु या रुग्णालयाला अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. त्यात या रुग्णालयात काही गरीब रुग्णांना तात्काळ उपचार किंवा नवी मुंबई, पनवेल शहरातील रुग्णालयात पुढील उपचारासाठी जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. सदर रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी अनेक वेळा जनतेकडून मागणी करण्यात आली आहे.परंतु वैद्यकीय अधीक्षक रुग्णालय समितीच्या अकार्यक्षमतमुळे आजही रुग्णांना, जनतेला सुविधा प्राप्त झाल्या नाहीत हे मागील सहा वर्षे रुग्णालयातील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी बरोबर इतर पदाच्या माध्यमातून पुढे येत आहे. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज भंद्रे हे दि.१६-६-२०१३ पासून डॉक्टर तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ चाकूरकर यांच्या निधनानंतर सदर रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून जिल्हा परिषदेचे _ मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गवई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. त्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून सी आर एस फंडातून रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
उरणमधील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपाल सहा वर्षांपासून रिक्त