जेएनपीटी (वार्ताहर)-जेएनपीटी बंदराकडेजाणाऱ्या रस्त्यावरील सोनारी गावाच्या प्रवेशद्वाराजवळच परप्रांतीय नागरीकांनी हातगाडी, टपऱ्या, चिकनची दुकाने उभारली आहेत. या वाढत्या अतिक्रमणाचा त्रास सोनारी गावातील नागरिकांना तसेच तेथील सिध्दीविनायक मंदिरात येणाऱ्या असंख्य भाविकांना सहन करावा लागत असल्याने सदरचे अतिक्रमण जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने पुढाकार घेऊन हटवावे, अशी मागणी सरपंच पुनम कडू यांनी केली आहे. सोनारी गावातील प्रकल्पग्रस्त रहिवाशांनी जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी आपल्या शेतजमिनी गावाजवळून जेएनपीटी बंदराकडे जाणान्या रस्त्याची निर्मिती ही जेएनपीटी बंदर प्रशासनाने केली आहे.परंतू जेएनपीटी बंदराचे प्रशासन नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने आज रस्त्या जवळील जागेवर परप्रांतिय नागरीकांनी हातगाडी, टपऱ्या व चिकन दुकानाचे बस्तान मांडले आहे. या अतिक्रमणाचा नाहक त्रास हा सोनारी गावात प्रवेश करणारे नागरीक, भाविक तसेच वाहन चालकांना सहन करावा लागत असून अपघाताला ही सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे सोनारीतील अतिक्रमण जेएनपीटीने त्वरीत हटवावे, मागणी सरपंच पुनम कडू यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सोनारीतील अतिक्रमण जेएनपीटीने हटविण्याची मागणी