'कोरोना' प्रतिबंधासाठी अधिकाऱ्यांची विशेष नेमणूक
नवी मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अंमलबजावणी सुरु झाली असून नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोव्हिड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना करण्याकरिता सक्षम प्राधिकारी म्हणून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महा पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व महावीर पेंढारी यांच्या नियंत्रणाखाली कालच येत्या दि.१४ एप्रिल पर्यंत महापालिका मुख्यालयातील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये महापालिका पालिका अधिका-यांची विशेष नेमणूक करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये नियंत्रण अधिकारी असलेल्या अतिरिक्त आयुक्त यांचेसह समन्वय अधिकारी म्हणून प्रत्येक आठवड्यात प्रतिदिन सकाळी ८ ते रात्री ८ व रात्री ८ ते सकाळी ८ अशा २४ तासांसाठी विभागप्रमुख दर्जाचे अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या समन्वय अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक दिवशी सहकारी अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता व उप अभियंता तसेच सहा. आयक्त दर्जाचे २ अधिकारी काम पाहणार आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या दिवशी विहित वेळेत आपले दैनंदिन कामकाज सांभाळून कोरोना विषाणूचा नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रादूर्भाव Happ हाउनशाम्य कावा केलाअसे रोखण्यासाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये कार्यरत होऊन योग्य कार्यवाही करावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दि. १५ मार्च रोजी विशेष आदेश जारी करत करोना विषाणचा प्रसार होऊ नये याकरीता खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकाक्षेत्रात अनेक प्रतिबंधात्मक सूचना करण्यात आल्या आहेत.