उरण (प्रतिनिधी) - उरण द्रोणागिरी नोडमधील एपीएम टर्मिनल्स कंपनीतील साडेतीन कोटींची अफरातफर झाला आहे. या गुन्ह्याची नोंद उरण पोलीस ठाण्यात दोन महिन्यांच्या आधी गुन्हा दाखल झाला आहे. खून प्रकरणातील आरोपींना जेरबंद करणाऱ्या उरण पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यश न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. द्रोणागिरी नोडमधील एपीएम टर्मिनल हे जेएनपीटीचे मालाची नेआण करणारे गोदाम आहे. यामध्ये शुभम क्लेअरिंग अँड फॉरवींग एजन्सी बरोबर आरोपी शाहरुख फारुख शेख, यतीन कदम, रिझवान मुराद अली सोलकर, प्रणय गावंड, सूरज परमानंद नाखवा यांनी संगनमताने कंपनीला सिएचएद्वारे आलेल्या रोख व साडेतीन कोटींची फसवणूक केली. एपीएम टर्मिनलचे फायनान्स विभागाचे प्रकाश मधूकांत चंदेभमर यांनी याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर २०१९ रोजी दाखल केली आहे. आरोपी विरोधात भांदवी ४०८, ४६५, ४६७, ४६८, ४७७(अ) ३४ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन दोन महिन्याचा अवधी उलटूनही आरोपींना अटक करण्यात उरण पोलिसांना यश न आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
<no title>एपीएम टर्मिनल्स कंपनीतील कोट्यावधी रुपयांची अफरातफर करणारे आरोपी मोकाट