तळोजा (वार्ताहर)- दारू पिऊ न तळोजा पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणे एका गृहस्थाच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी जगदीश जिवनराव मोरे नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हकीकत अशी कि, तळोजा से-७ येथील । बलाईन सोसायटीतील रहिवाशी असलेले जगदिश जीवनराव मोरे यांच्याविरोधात त्यांच्या सोसयटीत राहणाऱ्या । अनिल वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून तळोजा पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. या कारणावरून जगदिश मोरे हा तक्रारदार वर्मा व सोसयटीतील इतर रहिवाश्याना मद्यप्राशन करुन शिवीगाळ करून दमदाटी करत होता. त्यानंतर मोरे यांनी तळोजा पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घालण्यास सुरवात केली. यानंतर पोलिसांनी मोरे यास ताब्यात घेऊन त्यास तपासणीसाठी उप जिल्हा रुग्णालय, पनवेल, येथे नेले असता तेथील वैद्यकिय अधिकारी यांनी सादर केलेल्या वैद्यकिय अहवालामध्ये मोरे याने मद्यप्राशन केल्याचे नमुद केले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार जगदीश मोरे याच्याविरोधात तळोजा पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी आधिनियम ८५ (१) अन्व्ये गुन्हा दाखल केला आहे.
दारू पिऊन पोलीस ठाण्यात धिंगाणा, गुन्हा दाखल