नवी मुंबई (प्रतिनिधी) - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांवर सध्या चांगलीच दहशत पसरली आहे. या विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी विद्यार्थीही जागरूक झाले असून, शनिवारी कोपरखैरणे येथील रा.फ. नाईक शाळेतील विध्यार्थी मास्क लावून शाळेत आले होते यावेळी अभ्यास करतानाही शाळेतील सर्व विद्यार्थी मास्क तोंडाला लावून असल्याचे पहायला मिळाले. शहरातील इतर काही शाळांमध्ये हे चित्र सध्या दिसत आहे. राज्यात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र सध्या दहशतीच वातावरण पसरले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा धोका पाहता खबरदारीचे पाऊल म्हणून सर्वांकडून सध्या विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे दिसत आहे. शाळकरी मुलांना मास्क लावण्याची सक्ती नसली तरी खबरदारी म्हणून शाळकरी मुले मास्क लावून येताना दिसत होते. त्यात कोपरखैरण्यातील रा. फ. नाईक शाळेत हे चित्र मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाल्याने मास्क बाबतचीही एक प्रकारे जनजागृती झाली. मास्क बरोबरच बहतांश विध्यार्थी सनिटीयझर आपल्या सोबत शाळेत घेऊन येताना दिसत आहेत. प्रामुख्याने, गर्दीच्या ठिकाणी समजा आपल्याला जावे लागले, तर आपला साधा रुमालसुद्धा डबल घडी घालून तोंडाला लावला तरी काही हरकत नाही. केवळ हॉस्पिटलमध्ये काम करणारे किंवा 'कोरोना' संशयित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, हॉस्पिटलमधील कर्मचारी यांनी एन ९५ मास्क तसेच त्याबाबतचे संपूर्ण किट वापरण्याची गरज आहे. मुळात मास्क याचा अर्थच असा आहे की, धूळ असेल किंवा असे काही मायक्रो बॅक्टेरिया जे थेट आपल्या नाकावाटे शरीरात जाण्यास नकोत, त्यासाठीच मास्क वापरतात. डबल लेयर, ट्रिपल लेयर, एन ९५, असे काही मास्कचे प्रकार आहेत. पण 'कोरोना' विषाणूचा आकार इतर विषाणूंपेक्षा मोठा असतो. तो साध्या रुमालाच्या घडीमधून शिरकाव करू शकत नाही. त्यामुळे तोंडाला रुमाल बांधला तरी काहीच हरकत नाही. असे तज्ञ सांगतात.
कोरोनोचा धसका... मास्क लावून विद्यार्थी शाळेत!