प्रकल्प उभारण्याबरोबरच शेतकऱ्याना वाढीव दर द्या - आ.प्रशांत ठाकूर


पनवेल (प्रतिनिधी) - खारेपाटातील शहापूर-धेरंड (ता.अलिबाग) येथील जमिनीवर प्रकल्प उभारण्याबरोबरच या प्रकल्पासाठी यापूर्वीच जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांनाही वाढीव दर देण्यात यावे, अशी मागणी आ.प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली आहे. दहा वर्षे होऊनही या जागेवर प्रकल्प उभा राहिला नाही आणि दहा वर्षांपूर्वीच्या दरात आणि आत्ताच्या दरात मोठ्या प्रमाणात तफावत असणार आहेत्यामुळे अगोदर जमिनी दिलेल्या शेतक-यांचे त्यांना वाढीव दर देण्याचे यातून अधोरेखित केले आहेया प्रश्नावर राज्याचे उद्योगमंत्री उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, शहापूर येथील खातेदारांनी गावाचा विकास होणेकामी महामंडळास जमीनी देण्यास तयारी असल्याचे निवेदन दिले आहे तसेच जमिनी औद्योगिक कारणासाठी संपादन करावे याबाबत उपविभागीय अधिकार, अलिबाग याचेकडे स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर केले. त्यानुसार मौजे शहापूर, ता.अलिबाग, जि.रायगड येथे खाजगी ७३६.३९४ है.आर व सरकारी .८६८ है. आर क्षेत्र अधिसुचीत करण्यात आलेले आहे.