हळदी-कंक कार्यक्रम थांबवा

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचे आवाहन


नवी मुंबई (प्रतिनिधी) - येत्या महिन्यात नवी मुंबई महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात विविध राजकीय पक्षांकडून हळदी-कुंकू समारंभाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र गर्दीच्या ठिकाणी कोरोनोचा होणारा संसर्ग पाहता अशा प्रकारचे कार्यक्रम रद्द करावे किंवा कार्यक्रम टाळावे, असे आवाहन पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्वच राजकीय व सामाजिक संघटनांना केले आहे. महापालिकेच्या वाशीतील रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक ही येत्या एप्रिल महिन्यात _होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी हळदी-कुंकू, महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे. तब्बल ३ ते ४ तास हे कार्यक्रम चालतात. त्यामुळे कोरोना सारख्या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे. ही विशेष बाब लक्षात घेता हळदी-कुंकीवाचे कार्यक्रम रद् करण्या विषयी आयुक्त मिसाळ यांना विचारणा करण्यात आली होती. त्या विषयी माहिती देताना आयुक्त मिसाळ यांनी हे आवाहन केले आहे.