उघड्यावर फेकला गेलाय शेकडो गोणी सडका कांदा


उरण (प्रतिनिधी) - आधीच देशात चीन वरून आलेल्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. त्यातूनच देशभरातील आरोग्य यंत्रणा कमालीची जागी झालेली असतानाच उरणच्या भेंडखल गावालगत असलेल्या सरकारी कंटेनर यार्डमध्ये विविध देशांतून आलेला सडका कांदा इतस्तत: फेकून दिला असल्याचे उघड झाले आहे. बामर लॉरी नामक गोदामातील हा प्रकार गोदामातील काही कामगारांनीच कांद्याला वास येऊ लागतात उरणमधील पत्रकारांना फोटो पाठवून बिंग फोडले. याबाबत बामर लॉरी व्यवस्थापक लुईस यांच्याशी संपर्कसाधला असता तो कांदा विविध पार्टीने घेऊन जावा यासाठी बाहेर काढला असल्याचे सांगितले. मात्र कांदा तर सडला असून मागील तीन दिवसांपासून तो घेऊन जाण्याची कोणतीही प्रक्रिया सुरू नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनात आणून देताच त्यावर काहीही भाष्य करण्याचे लुईस यांनी टाळले आहे. गोदामांचे अधिकारी हे सदरचा नाशवंत कांदा त्या त्या पाट्या घेऊन जात असल्याचे सांगितले जात असले तरीही मागील तीन दिवसांपासून बालमर लॉरी गोदामातील काही पत्राशेडच्या बाहेरच्या भागात हा सडका कांदा प्लॅलेटस च्या बाजूला टाकण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या सडक्या कांद्याला आता वास मारू लागला असून यातून काही रोगराई पसरल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.