आज, उद्याच्या सुट्टीच्या दिवशीही नवी मुंबईतील नागरिकांना दाखल करता येतील हरकती, सूचना

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२० करिता प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करून दि.९ मार्च रोजी नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीतील निवडणूक विभाग व संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सदर प्रारूप मतदार याद्यांवर दिनांक १६ मार्च २०२० पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे. आज शनिवार, दि.१४ मार्च व रविवार दि. १५ मार्च रोजी महापालिका कार्यालयास शासकीय सुट्टी आहे. मात्र तरीही नवी मुंबई महापालिका मुख्यालय निवडणूक विभाग व संबंधित विभाग कार्यालयात या दोन्ही दिवशी कार्यालयीन वेळेत प्रारूप मतदार याद्या उपलब्ध होतील व नागरिकांकडून हरकती व सूचना स्विकारण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने देण्यात येत आहे.