तुर्भे स्टोअर्स येथे अपघातात एकाचा बळी

उड्डाणपुलाअभावी नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर...



नवी मुंबई (प्रतिनिधी)- ठाणे- बेलापूर रोडवर तुर्भेस्टोअर्सपरिसरामध्ये प्रतिदिन वाहतूक कोंडी होण्यासह येथे वारंवार अपघाती घटनात वाढ होऊन आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला असतानाच बुधवारी रात्री कंटेनरने दिलेल्या धडकेत वाशीतील शिंदे नामक तरुणाचा मृत्यू झाला. तर ही घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी पाचच्या सुमारास केके रोड येथे एक भरधाव डंपरने थेट येथील स्थानकात प्रवेश केल्याची घटना घडली. दरम्यान, ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे स्टोअर्स परिसरातील या वाढत्या घटना पाहता सदर ठिकाणी नागरिकांच्या सोयिसाठी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव रखडला असतानाच आता पुन्हा एकदा अपघाती घटनेत एकाच बळी गेल्याने येथील नागरिकांच्या सुरक्षेचा मूदा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईमधील महत्वाच्या रोडमध्ये ठाणे बेलापूर रोडचाही समावेश होतो. या रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महापालिकेने रोडचे काँक्रेटीकरण केले आहे. मात्र अनेक वर्षांपासून सर्वाधीक वाहतूक कोंडी होत असलेल्या तुर्भे रेल्वे स्टेशन व तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. परिसरातील नागरिकांना भरधाव रस्ता ओलांडून रेल्वे स्टेशनकडे जावे लागत आहे. रस्ता ओलांडताना वारंवार अपघात होत आहे. यापूर्वी १३ ऑक्टोबरला टँकरने धडक दिल्याने याच भागातील एका महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र असे असतानाही काल या मार्गावर पुन्हा अपघाती घटना होऊन एकाचा बळी गेला. त्यामळे अशाप्रकारचे अपघात येथे वारंवार होत आहेत. सकाळी व सायंकाळी या परिसरामध्ये प्रचंड वाहतक कोंडी होत असते. अर्धा तास व त्याहीपेक्षा जास्त वेळ येथे वाहतक कोंडीत अडकन रहावे लागत आहे. येथील या अपघाती घटना पाहता ही समस्या सोडविण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांसह नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी वारंवार केली आहे. एमएमआरडीए महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून पुढील कार्यवाही वेगाने करण्याचे आश्वासनही दिले होते. परिसरातील वाहतुकीचा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा उडाणपूल उभारण्यात यावा या मागणीसाठी त्यांच्याकडून रास्ता रोखो आंदोलनही करण्यात आले होते. परंतु अद्याप उड्डाणपूल उभारण्यासाठी काहीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी जैसे थे स्थिती येथे असल्याचे दिसत आहे.