नवी मुंबई (प्रतिनिधी) जुईनगर येथे आयोजित नवी मुंबई महापौर चषक पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते काल उद्घाटन झाले. नवी मुंबईतील तरूणांमध्ये शरीरसौष्ठवाचे आकर्षण असून तरूणाईतील शक्तीला प्रोत्साहित करण्यासाठी महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेप्रमाणेच महापौर चषक पॉवर लिफ्टींग स्पर्धा आयोजित करण्यात आले असून नागपूरपासून राज्यातील विविध ठिकाणच्या पॉवर लिफ्टर्सनी यात सहभाग घेतल्याने स्पर्धेचे यश यातून स्पष्ट होते, असे प्रतिपादन महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका तनुजा मढवी, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग फेडरेशनचे उपाध्यक्ष दिलीप करकाडे व खजिनदार सरला शेट्टी, शिवछत्रपती पुरस्कारप्रा पलविंदर सैनी, संतोष भुरटे आदी उपस्थित होते.
जुईनगर येथे नवी मुंबई महापौर चषक पॉवर लिफ्टींग स्पर्धा