उरण (प्रतिनिधी) - माहेरकडून चार चाकी गाडी तसेच संसारोपयोगी वस्तु देण्यात आल्या नाहीत या कारणावरून विवाहितेला मानसीक व शारिरीक त्रास तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत छळ केल्याची घटना चिर्ले ता उरण येथे घडली असून या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळीविरोधात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पती मनिष विलास मढवी याच्यासह सासु रजनी विलास मढवी, सासरे विलास बबन मढवी, पतीची आत्या लक्ष्मी भोईर व अल्पवयीन नणंद सर्व रा चिर्ले तसेच आत्या अरूणा महेश पाटील व महेश पाटील दोन्ही रा उरण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत. या घटनेतील पीडित मनश्री म्हात्रे (२२वर्षे,)रा- तांडेळवाडी करंजा रोड दत्त मंदीरामोर उरण हिचा वर्ष २०१९ मध्ये चिर्ले येथील मनिष विलास मढवी याच्याशी झाला. मात्र सुरवातीचे काही महिने चांगले गेल्यानंतर मनीष मढवी याने पत्नी मनश्री हिला सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसीक सास देवुन तु माहेराहून आमचे साठी रक्कम घेवुन येत नाही, संसार उपयोगी वस्तु तुझ्या आई वडीलांनी दिल्या नाहीत. तसेच फोर व्हीलर गाडी आम्हाला दिली नाही यावरून नेहमीच छळ सुरु केला. शेवटी या सर्व जाचास कंटाळुन मनश्री हिने उरण पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या लोकांच्या विरोधात दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी भादंवि.कलम ४९८ (अ),५०४,३४ ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
हंड्यासाठी विवाहितेचा छळ: सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल